व्यक्तिस्वातंत्र्याचा स्पर्श
............व्यक्तिस्वातंत्र्याचा स्पर्श............ निसर्गातील कृरतेला सामोर जाण्यासाठी आदिमानवाने टोळी केली. टोळीचा विकास होताना समुहवादी समाज निर्माण झाला. विकसीत होत गेला. म्हणजे समुहाचा विचार,समुहाच्या गरजा,समुहाच संरक्षण हे त्याच्या विचाराच्या केंद्रस्थानी होत. शेतीच्या शोधाने समुह समृद्ध झाले. माणसाच्या जाणीवाही समुह म्हणुनच विकसीत झाल्या. अगदी मध्ययुगा पर्यंत,आधुनिक अर्थाची 'व्यक्ती ' म्हणुन जाणीव हिंदुस्थानातील माणसाला झाली नाही. या अगोदर 'स्व'चा विचार केवळ तत्वज्ञान आणि योगीयांच्या मांदीयाळी पुरता सिमीत होता.व्यापक भारतीय लोकजीवनाशी याचा तसा काही संमंध दिसत नाही. लोकजिवन हे समुहवादी होते समाजाचे हित हेच माणसाचे हित. व्यक्ति म्हणुन वेगळी जाणिव विकसीत झाली नव्हती. कुटूंबातील सर्व स्त्री पुरूष संपुर्ण कुटूंबाच्या हितासाठी राबत. गावासाठी राबत. ब्रिटीशांच्या भारतातील आगमनाने हिंदुस्तानातील जीवन व्यवहाराला व्यक्तिस्वातंत्र्य या नवीन जीवनमुल्याची जोड मिळाली. पुर्वी सामुहीक हित जोपासतांना व्यक्तिला तुलनेन गौण स्थान दिल जात हो...