व्यक्तिस्वातंत्र्याचा स्पर्श
............व्यक्तिस्वातंत्र्याचा स्पर्श............
निसर्गातील कृरतेला सामोर जाण्यासाठी आदिमानवाने टोळी केली. टोळीचा विकास होताना समुहवादी समाज निर्माण झाला. विकसीत होत गेला. म्हणजे समुहाचा विचार,समुहाच्या गरजा,समुहाच संरक्षण हे त्याच्या विचाराच्या केंद्रस्थानी होत. शेतीच्या शोधाने समुह समृद्ध झाले. माणसाच्या जाणीवाही समुह म्हणुनच विकसीत झाल्या. अगदी मध्ययुगा पर्यंत,आधुनिक अर्थाची 'व्यक्ती ' म्हणुन जाणीव हिंदुस्थानातील माणसाला झाली नाही.
या अगोदर 'स्व'चा विचार केवळ तत्वज्ञान आणि योगीयांच्या मांदीयाळी पुरता सिमीत होता.व्यापक भारतीय लोकजीवनाशी याचा तसा काही संमंध दिसत नाही. लोकजिवन हे समुहवादी होते समाजाचे हित हेच माणसाचे हित. व्यक्ति म्हणुन वेगळी जाणिव विकसीत झाली नव्हती. कुटूंबातील सर्व स्त्री पुरूष संपुर्ण कुटूंबाच्या हितासाठी राबत. गावासाठी राबत. ब्रिटीशांच्या भारतातील आगमनाने हिंदुस्तानातील जीवन व्यवहाराला व्यक्तिस्वातंत्र्य या नवीन जीवनमुल्याची जोड मिळाली. पुर्वी सामुहीक हित जोपासतांना व्यक्तिला तुलनेन गौण स्थान दिल जात होत.मग त्यात स्त्रीयांच समाजातील स्थान असो कि क्षुद्रांची प्रतिष्ठा असो. याला या न त्या कारनाने वगळले गेले. तशी जाणीवच नव्हती.
व्यक्तीस्वातंत्र्य हे माणसाला विकसीत करत. माणवी विकासात काही टप्पे पुढे घेऊन जात. व्यक्ती म्हणुन माणसाच संगोपण करत. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नव्या आयामामुळे विचारविश्वामध्ये आणि विकासव्यवहारामध्ये व्यक्ती एकक बनली. व्यक्तीचा विकास म्हणजेच समाजाचा विकास हा समुह विकासाचा नवा पाया बनला. सामुहीक विकास हा दृष्टीकोन आता परंपरावादी ठरला होता आणी व्यक्तिस्वातंत्र्याला वाव देणारा विचार पुरोगामी ठरत होता.
परीणती स्वरूप व्यक्तीच जगणं प्रतीष्ठेच असाव,स्त्रीयांच स्थान उंचावल पाहीजे. अस्षृश्यता संपली पाहीजे. असे लढे उभारले गेले आणि बरेचसे यशस्वीही झाले. असे चागले परीणाम हिंदुस्थानी समाजाला लाभले.
ब्रिटीश हे मुळात व्यापारासाठी भारतात आले. व्यापारवृद्धी साठी धोरणे आखली मग त्यात धर्मप्रसार असो की शिक्षण प्रसार असो.या प्रक्रियेमधुन जो मध्यमवर्ग उदयास येईल तो ब्रिटिश मालाच भोक्ता असेल आणि कायम भोक्ता राहील अशी रचना निर्माण केली गेली. व्यक्तिवादी मांडणी ही ईंग्रजी धोरणाचे बीज असलेली आपणास दिसते. त्याचमुळे व्यक्तीस्वातंत्र्यात माणसाचा व्यक्ती म्हणुन जो विकास होणे अपेक्षीत आहे तो हिंदुस्थानात होताना दिसत नाही. उलट व्यक्ति एक ग्राहक म्हणुन सुधारली जाते.आता ईंग्रज नसले तरी बाजारासाठी ही मांडणी उपयुक्त असल्याने त्यांनी तो वारसा उचलला आणि आता विचारवंतही बाजार प्रणीत असल्याने तेही तसीच वाणी नोटाप्रमाणे चालवतात.
व्यक्तीस्वातंत्र्याची जाणीव आज एवढी प्रबळ झाली आहे की सामुहीक जिवन क्षीण होत आहे. सामुहीक जाणीव लोप पावत चालली आहे की काय अशी अवस्था आहे. माणसाला माणसाच मन कळेनास झाल. गरज असलेले सहजीवनही पेलने अवघड होत चालले आहे. कुत्र्याची हिपाजत माणसापेक्षा जास्त अशी अवस्था बर्याच घरी झाली आहे. नाती केवळ शब्दकोषात वाचावी आणि संस्कृतीच्या भंकस गप्पा माराव्यात एवढीच शिल्लक राहिली आहेत. प्रत्येक विषयात व्यक्तीवादाची जोड एवढी प्रबळ केली जात आहे की प्रत्येक व्यक्ती सुट्टी करून जाळ्यात ओढायची असे नियोजन त्यात दिसते. कळपाचा एकोपा भयंकर असतो.हिंस्त्रपशु सुद्धा कळपाच्या वाटेला जात नाहीत.
स्त्रीमुक्ती मध्ये स्त्रीयांच सामाजीक आणी कौटुंबीक स्थान ऊंचवाव.स्त्री आणि पुरूष समान आहेत ही जाणीव विकसीत करून स्त्रीला पुरूषांच्या समान आणुन ठेवाव.एवढे उद्दीष्ठ स्त्रीचळवळीच असाव.त्यांचा तर असा हट्टच दिसतो की फक्त स्त्रीच एवढी पुढे ओढत न्यायची की तिला चंद्रावर नेहुण ठेवायच.
तर अशाप्रकारे व्यक्तीवादी जाणीवा कमालीच्या प्रबळ झाल्याने जगण अवघड होत चालल आहे. कुटुंब ही भारतीय जिवनाचे एकक असलेली संस्था यामुळे भयभीत आहे. कुटुंबामुळेच समाजामध्ये मुल्यांच संक्रमण एका पिढी कडुन दुसर्या पिढीकडे होत असलेल दिसत. कुटूंब हे अनेक अंगाने सुरक्षा कवच म्हणुन काम करत.व्यक्तीवादाच्या रेट्यामुळ कुटूंबाप्रती बांधीलकी क्षीण होत असुन कुटूंबाचा आकार एवढा झपाट्यान आकसत आहे की जित्राबा सारख मोठ घर षटकोनात आल नंतर चौकोनात पुन्हा त्रिकोनात,रेषीय आता ठिपका.दोघांचेही विचार एक येण अवघड होऊन बसले आहे.सांरत काळी विचारात एवढी क्राती झाली आहे म्हणे आणि त्याला तंत्रज्ञानाची जोडही समतुल्य. वसुदैव कुटुंबकम् झालच म्हणुन समजा.आडाणी लोक संसाराचा भवसागर पार करतात आणि ज्ञानी (?) कोर्टाच्या दारी हेलपाटत असतात. माणुस जोडण्याच बळ आधुनीक विचारात नाही. व्यक्तीस्वातंत्र्य ते भान देत नाही.
दोघाचेच काय तर आपले आपल्याशीही जमेना झाले आहे. याचा राग कुणावर काढावा.सारखी आदळ आपट आपल्याशीच तंटा.आपल्यातुनच वेगळ कस व्हाव मग करतात आत्महत्या होतात मोकळे.हजारो वर्षा पुर्वी आडाणी आजा-पंजाच्या फुटकळ अनुभवातुन जन्माला आलेली नाती करपुन गेलेली असतात. परिणामी ध्यानशिबीराचे पिक बहरात येते.कडुलिंब पाडाला आला की कावळ्याचा सुकाळ येतो तसे झाले.
'स्व' हित हे आता समाजाचे राहीले नाही तर ते कुटुंबा पासुन स्वतः पर्यंत, संकोचीत झाले आहे.संकोचीत झाले का विकसीत झाले हे कळायला मार्ग नाही.
व्यक्तीस्वातंत्र्य भारतात आले तेच मुळात बाजारी पाऊलाने. पाश्च्यात्य शिक्षण ज्या उद्देशान भारतात प्रसुत झाल तोच मुळात अप्पलपोटी होता.त्यामुळे ज्या शिक्षणाने युरोपात जे अविश्कार केले ते भारतात होऊ शकले नाहीत.तेच व्यक्ती स्वातंत्र्याच झाल.त्याची वाटचाल अपेक्षीत आणी हितकर झाली नाही.
तत्वज्ञानातील स्व हा सात्वीक होता त्याचा आनंद सत्वगुणी होता. व्यक्तीस्वातंत्र्य आज तमोगुणात प्रवेशले आहे.त्याचा आनंद अघोरी,तमी झालेला आहे.
व्यक्ती स्वातंत्र्याच्या अती फोडणीमुळे देशी विचारपद्धती प्रतीगामी ठरत आहे.हिंदुस्थानला जी निरंतर आणि चिरंतर ठेवू शकते तिची बरीचशी मोडतोड बाजारी विचारामुळे झाली आहे.
आजच्या सोप्या शब्दात सागायचे तर सतत(sustainable ) आणि टिकावू जिवनासाठी आपल्याला पुन्हा देशी पध्दतीने समुहवादी(कौटुंबीक) विचार करावा लागेल.कारण तो आपल्या भुगोलाला धरून असतो. तो कुणाचा भाट नसतो, तिरायताच्या उद्धारासाठी नसतो.त्यात दोष असु शकतो.त्याची गाळणही केली पाहीजे.निर्दोष प्रवाह पुढे नेला पाहीजे. स्वहीत त्यातुनच साधता येईल.
Comments
Post a Comment